... तरीही शिक्षकांचे महत्व कमी होणार नाही
उपनेते अनिल राठोड : शिवसेनेच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार
माय नगर वेब टीम
अहमदनगर - शिक्षकाचे स्थान काल, आज आणि उद्या समाजात व देशात अढळ राहणार आहे. सध्या शिक्षक हे केवळ शिकविण्याचे काम न करत ते मार्गदर्शक आहेत. शिक्षकांचे व्यक्तीमत्वामुळे विद्यार्थ्यांची प्रगती व त्यांना मिळणार्या प्रेरणेवर होत असतो. शिक्षक हा विद्यार्थी घडवत नसतो, तर तो भावी समाज घडविण्याचे मोठे काम करत असतो. संस्कारक्षम विद्यार्थी घडवून मजबूत राष्ट्र बनविण्यात शिक्षकांचा मोठा वाटा आहे. आज शिक्षण क्षेत्र कितीही बदलले, शिकविण्याचे प्रक्रियेत कितीही बदल झाले तरी संस्कारक्षम शिक्षकांचे महत्व कमी होणार नाही, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.
शिवसेनेच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त शहरातील शिक्षकांचा शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रा.शिरिष मोडक, प्रा.एम.बी.मेहता, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास शिंदे, शहराध्यक्ष पारुनाथ ढोकळे, कार्याध्यक्ष रावसाहेब म्हस्के, विठ्ठल तिवारी, प्रा.भगवान काटे, प्रा.मारुती शेळके, राजेंद्र झावरे, बाबुलाल सय्यद, श्रीराम खाडे, अभिजित गवारे, जुबेर पठाण, दत्तात्रय धामणे, जालिंदर गोरे, दत्तात्रय कजबे आदि उपस्थित होते. प्रारंभी नेता सुभाष प्रतिष्ठानच्या श्री गणेशाची आरती शिक्षकांच्यावतीने करण्यात आली.
याप्रसंगी प्रा.शिरिष मोडक म्हणाले, शिक्षक हा शिल्पकार आहे, त्यामुळे शिक्षक-विद्यार्थी परस्परपुरक असावेत, चांगला शिक्षक विद्यार्थ्यांना नेहमीच विचारप्रवृत्त करतो, आजच्या काळात शिक्षक होणे हा विचार क्रांतीकारक समजला जात आहे. कारण आता बदलत्या आधुनिक शिक्षणपद्धतीमुळे शिक्षकांनाही या बदलाला सामोरे जावे लागत आहे, त्यासाठी शिक्षकांनीही नवनवीन तंत्रज्ञान स्वत: आत्मसात करुन त्याचा अभ्यासक्रमात उपयोग केला पाहिजे.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अंबादास शिंदे म्हणाले, शिक्षक सेनेच्यावतीने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांसाठी विविध चर्चासत्रे, कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात असते. त्याचबरोबरच शिक्षकांच्यावतीने विविध उपक्रमातून विद्यार्थीना शिक्षणातील नवनवीन विषयांची माहिती दिली जात आहे. शिवसेनेच्यावतीने शिक्षकांचा सन्मान करुन त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी केले तर आभार रावसाहेब म्हस्के यांनी मानले. यावेळी बाबासाहेब शिंदे, देवीदास बुधवंत, सुदाम रावळ, प्रा.सोमनाथ नजान, निलेश झरकर, संतोष निमसे, संदिप वाघमारे, अमेाल इथापे, दिगंबर हरबा, हरिष घायतडक, समीर पठाण, गणेश औशिकर, ऋषीकेश अष्टेकर, दत्ता नागापुरे आदि उपस्थित होते.
Post a Comment