बसस्थानकात अतिरेकी घुसल्याची पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर होणार कारवाई






पोलीस निरीक्षक विकास वाघ यांची माहिती

माय नगर वेब टीम

अहमदनगर -

माळीवाडा बसस्थानकात एका बसमध्ये अतिरेकी घुसले असल्याचे सोशल मेडिया व्हाट्सअप च्या माध्यमातून अनेक मोठा असा अफवांचा डोंगर पसरत आहे तरी नागरिकांनी कुठल्याही प्रकारे घाबरून न जाता अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आव्हान कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी केले आहे. सदर प्रकार हा मॉकड्रील म्हणजेच गणेशोत्सव मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर अचानकपणे एखादी अनुचित घटना घडल्यानंतर ती कशा पद्धतीने हाताळवयाची याचे प्रात्यक्षिक पोलीस दलातर्फे करण्यात आले.

अहमदनगरच्या बस स्थानकावर पोलिसांच्या प्रात्यक्षिक जिल्हा पोलिस अधीक्षक इशू सिंधू व पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिक करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कुठलेही कारण नाही. सदर मेसेज व्हिडिओ कोणी व्हाट्सअप च्या व फेसबुकच्या माध्यमातून वायरल करत असेल तर लवकरात संबंधित व्यक्तींची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post