शिवसेनेत जाण्याचा प्रश्नच नाही ; आमदार जगताप यांचा खुलासा
माय नगर वेब टीम
अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राहिलेले संग्राम जगताप हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या होत्या. त्यावर आता त्यांनी खुलासा केला आहे.
माझी आणि शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्यांची भेट झाली नाही. मी शिवसेनेत जाण्याचा प्रश्नच येत नाही. सोशल मीडियामध्ये कोणीतरी ही अफवा पसरवली आहे, असे आमदार संग्राम जगताप यांनी स्पष्ट केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मागील आठवड्यात शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांची संग्राम जगताप यांनी भेट घेतली आणि जगताप शिवसेनेत जाणार, अशी पोस्ट सोशल मीडियामध्ये माझी कोणत्याही शिवसेना नेत्याची भेट झाली नाही. शिवसेनेमध्ये जाण्याचा माझा काहीही संंबंध नाही, अशी कोणाशीच कोणतीही चर्चा झाली नाही, असेे सांगत संग्राम जगताप यांनी शिवसेनेत प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
Post a Comment