बनावट फेसबुक अकाउंटद्वारे तरुणीची बदनामी करणारा तब्बल दोन वर्षानंतर गजाआड


दुसऱ्याशी लग्न केले तर ठार करेल अशी देत होता धमकी

माय नगर वेब टीम

अहमदनगर -

अहमदनगर जिल्ह्यातील एका उच्चशिक्षित तरुणीच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून तिची बदनामी करणारा दोन वर्षापासून फरार आरोपी आकाश शरद सोनटक्के रा. सातारा यास ताब्यात घेण्यात सायबर पोलिस विभागास अखेर यश आले आहे.

तरुणीच फेक अकाउंट तयार करून त्याच अकाऊंटवरून तिच्या भावास मेसेज केले जात होते. तुझ्या बहिणीचे लग्न दुसऱ्याशी कसे होते ते मी पाहतोच, ज्या मुलाशी लग्न करेल त्याला मी ठार मारून टाकेल अशी धमकी त्या फेक अकाउंट वरून तरुणीच्या भावाला देण्यात येत होती. दरम्यान याप्रकरणी मे 2017 मध्ये सदर फेक अकाउंट करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी हा तांत्रिक माहिती मध्ये चतुर असल्याने वेळोवेळी त्याचे ठिकाण व मोबाईल नंबर बदलत होता. त्यामुळे पोलिसांना त्याचा सुगावा लागत नव्हता. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, उपनिरीक्षक वैभव महांगरे, प्रतीक कोळी व सायबर पथकाने तांत्रिक विश्लेषण करून सातारा शहरांमध्ये दोन दिवस तळ ठोकला. स्थानिक पातळीवर सविस्तर माहिती घेतली. सदर आरोपीस सातारा संभाजीनगर,गोडोली येथे मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post