नेमकी कशासाठी मागितली लाच वाचा सविस्तर....
माय नगर वेब टीम
अहमदनगर- वन विभागाचा लाचखोर कर्मचारी शंकरराव ऋषीकेश पाटील (वय 42) RFO, वनजीव संरक्षण, रेहुकरी अभयारण्य, कर्जत, अहमदनगर हा 70 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात आज सापडला.
तक्रारदार हे गॅस वितरक असून, शासना मार्फत वन विभागाच्या लगतच्या गावातील नागरिकांना 75 % अनुदानावर गॅस वितरण केले जाते, त्या लाभार्थीची निवड यादी वनविभाग तयार करते. दरम्यान ती यादी गॅसवितरकडे वनविभाग देते, तक्रारदार यांनी 4 गावातील 233 लाभार्थ्यांना नवीन गॅस कनेक्शन दिले होते. त्याचे बिल तक्रारदार याना अदा झाले होते. अदा रक्कमेतून त्याचे कमिशन पोटी आरोपी यांनी प्रति लाभार्थी 350 रुपये प्रमाणे 233 लाभार्थी यांचे 81000 हजार रुपयाची मागणी तक्रारदार यांचेकडे पंचा समक्ष करून तडजोडी अंती 70000 हजार रुपये लाच स्वीकारण्याचे दि 17/07/19 रोजी मान्य करून 70000 हजार ररुपये लाच रेहुकरी अभयारण्य येथील विश्रामगृहात पंचा समक्ष स्वीकारले. सदर कारवाई हरीष खेडकर पोलीस उप अधीक्षक, श्याम पवरे पोलीस निरीक्षक, दीपक करांडे पोलीस निरीक्षक यांनी सुनील कडसाने पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, निलेश सोनवणे,अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

Post a Comment