नगर कल्याण रोडवर कंटेनर - बसचा अपघात ; एक ठार - चार जखमी



माय नगर वेब टीम


अहमदनगर - नगर कल्याण रोडवर कंटेनर व एसटी बसचा भीषण अपघात झाला. याअपघातात एस टी पलटी झाली असून त्यातील 4 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. एका
तरुणीचा मृत्यू झाला आहे. सुचित्रा बडे हिचा जागीच मृत्यू झाला.



कल्याण रोड वरून नगर - पारनेर (MH 40 N 8756) ही बस नगरच्या दिशेने येत होती. दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास बायपास चौकात बस व कंटेरची समोरा-समोर धडक झाली हा अपघात इतका भीषण होता की बस पूर्णपणे उलटी झाली. दरम्यान अपघाताची माहिती समजताच पोलीसानी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सूरु आहे

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post