'त्यांना' सेनेत प्रवेश देण्याचा संबंधच नाही- माझी व आ. जगतापांची भेटच झाली नाही




माय नगर वेब टीम

अहमदनगर - राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंंदे यांची भेट घेतल्याचे वृत्त समाजमाध्यमात प्रसारित झाल्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आले होते. शिवसेनेच्या स्थानिक शिष्टमंडळाने थेट ना.एकनाथ शिंदे यांची भेट घेत समाजमाध्यमात सुरू असलेल्या चर्चाची माहिती दिली. माझी व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांची कोणतीही भेट झाली नाही. त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्याचा कोणताही संबध नाही. अशी स्पष्टोक्ती मंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली.


मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे नगर संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, शहरप्रमुख दिलीप सातपुते, सुमित कुलकर्णी, शुभम बेंद्रे यांनी आदींनी भेट घेतली.

मागील काही दिवसापासून समाज माध्यमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यातच अनेक ठिकाणी तसे वृत्त देखील प्रसारित झाले होते. समाजमाध्यमात आलेल्या सर्व बातम्या व चर्चेची माहिती सातपुते यांनी पक्षश्रेष्ठीच्या कानावर घातली.


शिवसेना पक्ष हा शिवसैनिकांवर चालत आलेल्या आहे. नगरमध्ये शिवसेनेचे कार्य चांगल्या प्रकारे सुरू आहे. केडगाव मध्ये दोन शिवसैनिकांचे बळी गेले आहे. त्या प्रकरणात अनेक राजकीय व्यक्तीची नावे आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. ते कधीही मला भेटलेले नाहीत, विधानसभेमध्ये कधीतरी ते आपल्याला दिसतात त्यांच्या प्रवेशाबद्दल चर्चा झालेली नाही. त्यांना प्रवेश देण्याचा कोणताही संबंध नाही, अशी स्पष्टोक्ती मंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post