या पंधरवड्यात राज्यात नगर प्रथम




माय नगर वेब टीम
अहमदनगर - केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत देशातील दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यासाठी जलशक्ती अभियान  राबविण्यात येत आहे. जलसंधारण आणि पाऊसपाणी संकलन, पारंपरिक व इतर पाण्याच्या संरचनांचे नूतनीकरण, पाणलोट क्षेत्र विकास आदी कामे या अभियानांतर्गत करण्यात येत असून एक जुलैपासून या अभियानास देशभरात सुरुवात झाली आहे. देशातील 256 जिल्ह्यांत हे अभियान राबविले जात असून पहिल्या पंधरवड्यात लोकसहभाग आणि शाळांचा सहभाग यात नगर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक गाठला आहे.
श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता, राहुरी आणि संगमनेर तालुक्यात हे अभियान राबविले जात आहे. जलसंधारण व रेनवॉटर हार्वेस्टींग, परंपरागत जलस्त्रोतांचे नूतनीकरण, बोअरवेल व विहीर पुनर्भरण, पाणलोट क्षेत्रविकास आणि वृक्षलागवड आदी बाबींवर या अभियानात भर दिला जात आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध यंत्रणांनी कामास सुरुवात केली आहे. अधिकाधिक लोकसहभाग या अभियानात मिळावा, यासाठी तालुका व ग्रामपातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post