अबब...! पोलिसाची हप्तेखोरी, व्हिडीओ व्हायरल ; पोलिसांत खळबळ
माय नगर वेब टीम
अहमदनगर – जिल्ह्यातील पोलिसांना शिस्त लावू पाहत असलेल्या जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मनसुब्याला त्यांच्या खात्यातील तोफखाण्याच्या एका वसुली दादाने सुरुंग लावला आहे. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला असल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
‘मला ओळखलं का, मी… डीबी इन्चार्ज, अशी ओळख सांगत तोफखान्यातील दादा मटक्यावाल्याशी संभाषण करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून हाती लागला आहे. तोफखाना पोलीस ठाण्यातील स्वंघोषित डीबी इन्चार्ज पोलीस थेट मलावला आहे. टक्यावाल्यासोबत हप्त्याची बोलणी करत असून हप्ता न दिल्यास थेट ‘पत्ता’ उचलून नेण्याची धमकी ‘डीबी दादा’ देत असल्याचे त्यातून समोर आले आहे. वाळूमाफियाकडून पैसे घेणारा पोलीस निलंबित झाल्यानंतरही तोफखाना पोलिसांच्या ‘हप्तेखोरी’ला लगाम बसला नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
वाळूमाफियाकडून पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एसपी इशू सिंधू यांनी नंदू सांगळे नावाच्या पोलिसाचे निलंबन आदेश काढले. त्याचा धुराळा खाली बसतो न बसतो तोच तोफखाना पोलीस ठाण्यातील पोलीस प्रतापाच आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
‘पोलीस दादा’ थेट मटक्यावाल्यासोबत हप्त्याची भाषा करताना त्यात दिसत आहे. रात्रीच्यावेळी भररस्त्यात हप्तेखोरीची ही बोलणी सुरू असल्याचे त्यातून दिसते.
जिल्हा पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांनी पदभार घेताच अवैध धंदे चालकांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली. या कारवाईचा धसका घेत अवैद्य धंदे चालकांनी आपले धंदे आवरले. परंतु त्यांच्या खात्यातील वसुलीत माहीर असणाऱ्या पोलिसांनी आपले काळे धंदे सुरू ठेवले. गेल्या आठवड्यातच तोफखाना पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी याचा पैसे त्याचा पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याची एसपींनी तातडीने दखल घेत त्याला निलंबित केले. आता पुन्हा तोफखान्यातील पोलिसाचा खळबळजनक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्या पोलिसावर काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Post a Comment