
माय नगर वेब टीम
नवी दिल्ली - काँग्रेसच्या संसदीय दलाच्या नेतेपदी माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या कायम राहणार आहेत. काँग्रेसच्या संसदीय दलाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे.
काँग्रेसची संसदीय दलाची बैठक दिल्लीमध्ये 52 खासदारांच्या उपस्थितीत पार पडली. संसदेच्या आगामी अधिवेशनासाठी काँग्रेसची रणनिती या बैठकीत ठरवण्यात आली आहे.
बैठकीत सोनिया गांधींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर स्तुतीसुमने उधळली. राहुल दुरदृष्टी असलेला नेता आहे. तो पक्षाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल, असं त्या म्हणाल्या आहेत.
राहुल गांधींनीही यावेळी खासदारांशी संवाद साधला. त्यांनी नेत्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला.
Post a Comment