विधानसभा निवडणुकीची तयारी; ठाकरेंचा दौरा आजपासून सुरु




माय नगर वेब टीम

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची नव्याने मोर्चेबांधणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. ते आपल्या दौऱ्याला पुण्यापासून सुरुवात करणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीत सर्व ताकदीनिशी उतरण्यासाठी राज ठाकरेंचा मनसे पक्षही सज्ज झाला आहे.

राज ठाकरे स्वत:देखील मैदानात उतरले असून ते आता नव्या जोमाने काम करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या बैठकी घेणार आहेत.

पुण्यातील तीन दिवसाच्या दौऱ्यानंतर राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post