माय नगर वेब
मुंबई: काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीकाँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार नसल्याचं राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात
आले आहे. दरम्यान विधानसभा निवडणूक 100 दिवसांवर येऊन ठेपल्याने तयारीला लागण्याच्या सूचना यावेळी दिल्या.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक मुंबईत आज शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण न करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व नेते, नवनिर्वाचित खासदार, उमेदवार, पदाधिकारी आणि सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी
काँग्रेस पार्टी कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही. पक्षाचे स्वतःचे एक अस्तित्व आहे, हे अस्तित्व पक्ष कायम ठेवणार. कार्यकर्त्यांनी अफवांना बळी पडता कामा नये, असे आवाहन राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केलं.
जनता लोकसभेला वेगळा विचार करत असते आणि विधानसभेला वेगळा विचार करत असते. महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीत लोक वेगळा विचार करतील आणि या सरकारला खाली खेचतील, असा विश्वास व्यक्त करतानाच पराभव हा पराभव असतो. पण त्याने खचून जायचं नसतं, पुन्हा लढायचं असतं, असा सल्लाही अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार नसल्याचं स्पष्ट केलं.

Post a Comment