माय नगर वेब टीम
मुंबई / नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच माजी केंद्रीय केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना अंमलबजावणी संचलनालयकडून (ईडी) समन्य बजावण्यात आले आहेत. त्यानुसार, पटेल यांना 6 जून रोजी ईडी कार्यालयात हजर व्हावे लागणार आहे.
समन्स मुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. युपीए सरकारमध्ये ते नागरी उड्डयन मंत्री पदावर कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात कथित हवाई घोटाळा प्रकरणी चौकशी करण्यासाठी बोलावण्यात आले असे सांगितले जात आहे. ईडीच्या चौकशीला आपण पूर्णपणे सहकार्य करणार आहोत असे पटेल यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment