सत्कार नको, तो निधी दुष्काळ निवारणासाठी द्या - खा. सुजय विखे पाटील




माय नगर वेब टीम
अहमदनगर

दुष्काळाची तीव्रता गंभीर असून आशा परिस्थितीत सत्कार सोहळयासाठी कोणताही खर्च न करता कार्यकर्त्यानी यासाठीचा निधी दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावा असे आवाहन खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांनी केले आहे.

खा. डाॅ.विखे यांनी म्हणले आहे की, जिल्ह्यातील सर्व महायुतीचे कार्यकर्ते, हितचिंतक आणि सर्वसामान्य मतदारांनी विश्वासाने दिलेल्या पाठबळामुळे लोकसभा निवडणुकीत झालेलल्या विजयाचा आनंद व्यक्त होणे स्वाभाविक असले तरी, सध्या संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणात वाढली असून, पिण्याच्या पाण्यासह जनावारांसाठी चार्याची उपलब्ता करून देण्याचे मोठे आवाहन आपल्या सर्वाच्या समोर आहे.या सर्व परिस्थितीत कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून आयोजित केले जाणारे सत्कार सोहळे, तसेच सत्कारासाठी होणारा खर्च उचित ठरत नाही.त्यामुळेच जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांनी सत्कार सोहळ्यावर होणारा खर्च टाळून हा सर्व निधी दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावा असे आवाहन खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post