शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ; वार्षिक पेन्शन योजना अन सरसकट 6 हजार रुपये



माय नगर वेेेब टीम
नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत शेतकऱ्यांना वार्षिक पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रूपयेही देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. 
मोदींच्या दुसऱ्या इनिंगमध्ये आणि पहिल्याच बैठकीत शेतकरी हिताचा हा निर्णय घेतला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर इतर कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांनाही शपथ देण्यात आली. या सगळ्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत आता सगळ्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रूपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post