गांधींचा फोटो नोटेवरून हटविण्याची मागणी करणाऱ्या महिला अधिकाऱ्याच्या निलंबनाची आव्हाडांची मागणी




माय नगर वेब टीम

मुंबई : महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त आपल्याला गांधींना नोटेवरुन काढायला हवे. त्यांचे जगभरातील पुतळे हटवायला पाहिजे, असे वादग्रस्त वक्तव्य एका महिला IAS अधिकाऱ्याने केले आहे. निधी चौधरी असे या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांची सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) नियुक्ती करण्यात आली आहे.

‘150 व्या जयंती वर्षाचा अत्यंत जल्लोष सुरु आहे. (रडणारी इमोजी) आता वेळ आली आहे त्यांचा चेहरा चलनी नोटांवरुन हटवण्याची, जगभरातून त्यांचे पुतळे हटवण्याची, त्यांच्या पश्चात रस्ते आणि संस्थांना दिलेली नावं बदलण्याची, तीच आपल्या सर्वांकडून खरी आदरांजली ठरेल. धन्यवाद गोडसे. 30.01.1948’ अशा आशयाचं इंग्रजी ट्वीट करुन निधी चौधरींनी सोबत महात्मा गांधींच्या पार्थिवाचा फोटो जोडला होता.

दरम्यान, या संतापजनक प्रकारानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी निधी चौधरी यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post