किडन्या काढून घेण्याची धमकी; नगरमध्ये एकाने घेतला गळफास


माय नगर वेब टीम

अहमदनगर - पैसे न दिल्यास तुझ्या दोन्ही किडन्या काढून घेऊ अशी धमकी दिल्याने नगरमध्ये एकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी गोकुळ कालीदास सरोदे यांने तोफखान पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
अंकुश कालिदास सरोदे,  असे आत्महत्या केलेल्या तरुणांचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की , अंकुश कालिदास सरोदे, वय- 30 याने अमित चोरडिया (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याकडून 50 हजार रुपये व्याजाने उसने घेतले होते. ते पैसे परत घेण्यासाठी त्याने तगादा लावला होता. वेळोवेळी धमक्याही दिल्या होत्या. तसेच तुझ्या दोन्ही किडन्या काढून घेऊ असा दम दिला होता. या धमकी व जाचाला कंटाळुन अंकुश कालीदास सरोदे याने राहत्या घराच्या छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मयताचा भाऊ गोकुळ कालिदास सरोदे याने दिलेल्या फिर्यादिवरून अमित चोरडिया यांच्या विरोधात गुन्ह दाखल केला आहे.   पुढील तपास पीएसआय सोनवणे हे करत आहेत

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post