'पृथ्वी अ‍ॅग्रो' वर गुन्हा दाखल करुन परवाना रद्द करा- संभाजी ब्रिगेड


माय नगर वेब टीम

अहमदनगर

पृथ्वी अ‍ॅग्रो सर्व्हिसेस या विक्रेत्याने किटकनाशकवर बनावट लेबल लावून विक्रीसाठी किटकनाशकाचा वापर केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करुन त्याचा होलसेल व घाऊक विक्रीचा परवाना रद्द करण्यात यावा, दुकान व गोडावून सील करुन सर्व माल जप्त करण्यात यावा, जिल्ह्यात असलेल्या सर्व होलसेल व घाऊक खते, बि बियाणे, किटकनाशक विक्रेत्यांच्या दुकान, गोडावून व खरेदी विक्री रजीस्टरची तपासणी करुन दोशींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, माजी जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

संभाजी ब्रिगेडने केलेल्या मागण्यांनुसार तीन दिवसांत कारवाई करावी, अन्यथा 21 मे 2019 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा यावेळी दिला.

16 मे 2019 रोजी गुरुवारी नगर शहरातील मार्केट यार्ड परिसरातील पृथ्वी अ‍ॅग्रो सर्व्हिसेस या बि बियाणे, किटकनाशक होलसेल व रिटेल विक्रेत्या दुकान व गाडावून येथे कृषी विभागाच्या मुख्य गुणवत्ता नियंत्रक पथक, मोहीम अधिकारी कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी तसेच पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्या पथकाने छापा टाकून दुकान व गोडाऊनची तपासणी केली असता अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दुकानातून व गोडाऊनधून लाखोंची मुदतबाह्य किटकनाशकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. गोडावून तपाणीचे काम अधिकार्‍यांकडून सुरु आहे. मुदतबाह्य किटकनाशकांचा साठा पकडल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांची याची गंभीर दखल घेतली नसल्याचा आरोपी संभाजी ब्रिगेडने केला. याबाबतचे निवेदन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहमदनगर, जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहे. दरम्यान, यापुढे असे कोणी करतांना आढळून आल्यास त्यांची गाढवावर बसून धिंड काढण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.






0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post