निकालाआधी हाचचालींना वेग, चंद्राबाबूनी घेतली शरद पवारांची भेट; प्लॅन ठरला??





माय नगर वेब टीम

नवी दिल्ली - लोकसभा निकाल पाच दिवसांवर येऊन ठेपलाय. निकालाआधीच राजधानी दिल्लीत हालचालींना वेग आलेला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

शरद पवारांच्या 6 जनपथ या निवासस्थानी नायडूंनी त्यांची भेट घेतली. या भेटीची राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगत आहे.

आम्हाला पंतप्रधानपद नाही मिळाले तरी चालेल, फक्त मोदी शहा ही जोडी सत्तेवर बसता कामा नये, असा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे. यामुळे महाआघाडीतल्या पक्षांच्या आणि नेत्यांच्या महत्वकांक्षा वाढल्या आहेत.

शरद पवार आपल्या राजकीय डावपेचांसाठी सर्वांना ज्ञात आहेत. या भेटीत नेमकं काय शिजले ? हे मात्र अनुत्तरितच आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post