निवडणूक कामात हलगर्जीपणा ; 42 बँक अधिकार्यांना नोटीसा
माय नगर वेब टीम
अहमदनगर- शिर्डी व नगर लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या गुरुवारी (दि.23) रोजी असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अधिकारी, कर्मचार्यांना प्रशिक्षण ठेवले होते. या प्रशिक्षणास गैरहजर असलेल्या 42 बँक अधिकार्यांना कारणे दाखवा नोटीस प्रशासनाने बजावली आहे.
नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदार संघाची निवडणूक झाली असून मतमोजणी गुरुवारी (दि.23) रोजी एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोडावून येथे होणार आहे. निकालाच्या दिवशी अधिकारी कर्मचार्यांना काही अडचन निर्माण होवू नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी मंगळावारी (दि.14) रोजी 750 अधिकारी कर्मचार्यांना सहकार सभागृहात मतमोजणी प्रशिक्षण ठेवले होते. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील 21 सुक्ष्म निरीक्षक (राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी, कर्मचारी) गैरहजर राहिले होते. तर शिर्डी लोकसभा मतदार संघातील 21 अधिकारी व कर्मचारी असे एकूण 42 अधिकारी कर्मचारी गैरहजर राहिले. त्यांना प्रशासनाने विनापरवानगी गैरहजर राहून निवडणुका कामात कसूर केल्या प्रकरणी लोकप्रतिनिधी अधिनीयम नुसार कारवाई का करू नये याबाबत खुलासा मागितला आहे. हा खुलासा रविवारी (दि.19) रोजी द्यावा लागणार आहे.

Post a Comment