अनैतिक संबंधातून खुनप्रकरणी एकास जन्मठेप


माय नगर वेब टीम

अनैतिक संबंधातून खुन केल्या प्रकरणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने, आरोपीस दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

शुक्रवार (दि.17) रोजी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी बाळासाहेब बाबासाहेब भगत (वय.22 रा. देवगाव ता.नेवासा यास दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

1 एप्रिल 2017 फिर्यादी भानुदास गणपत धेडगे उर्फ भगत याचे शेतात देवगाव येथे आरोपी संगिता शंकर धेडगे उर्फ भगत ही शंकर भानुदास धेडगे यांची पत्नी असुन तिने तिचा चुलत दिर बाळासाहेब भगत याचे सोबत अनैतिक संबंध असल्याने दोघांनी संगमनमताने मयत शंकर यास जीवे ठार मारण्याचा कट रचुन विहीरीवर मोटार चालु करण्यासाठी गेलेल्या शंकरला संगीता धेडगे हीच्या सांगणेवरुन आरोपी बाळसाहेब धडगे उर्फ भगत याने त्याचे डोक्यात गजाने दुखापत करुन ठार मारले. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत गुन्ह्याचा तपास पोसई एस.एस.पाटील यांनी केला असून, सरकारी पक्षाचे बाजुने वकील बी.एल. तांबे यांनी काम पाहिले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post