भगवान नृसिह देवस्थान च्या यात्रोत्सवास शनिवार पासून प्रारंभ

माय नगर टीम 



नगर तालुक्यातील भातोडी येथे भगवान नृसिहाचे जागृत देवस्थान आहे. भगवान नृसिहाच्या जयंतीनिमित्त शनिवार पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे.
शनिवारी (११/५/२०१९) पहिल्या दिवशी ह.भ.प. आदिनाथ दानवे( देऊळगाव घाट) यांच्या किर्तनाने प्रारंभ होईल, दुसऱ्या दिवशी रविवारी ह.भ.प. नवनाथ माऊली (कोपरगाव), सोमवारी ह.भ.प. किशोर जाधव (राहुरी), मंगळवारी ह.भ.प. भागवत बादाडे (बीड), बुधवार ह. भ.प. नारायण काळे (आळंदी), गुरुवारी ज्ञानेश्वर कदम (आळंदी), शुक्रवारी श्रीनिवास घुगे (आळंदी ) यांचे सायंकाळी ७ ते ९ या वेळेत हरी किर्तन होईल, तसेच शुक्रवारी त्याच दिवशी जयंतीनिमित्त दुपारी ४ ते ६ या वेळेत ह. भ. प. तुळशीराम लबडे यांचे देवजन्माचे कीर्तन होईल, सप्ताहाची सांगता शनिवारी सकाळी 9 ते १० या दरम्यान ह.भ.प. पंढरीनाथ उंबरेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने होईल. त्यांनतर महाप्रसादाचा लाभ सर्व भाविकांसाठी ठेवण्यात आला आहे. तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे अहवान नृसिह देवस्थान चे अध्यक्ष विठ्ठल कदम यांनी केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post