वाहनांच्या धडकेत तीन हरणांचा मृत्यू

माय नगर टीम
नगर-कल्याण बायपास रस्त्यावर एमआयडीसी परिसरात अज्ञात वाहनांच्या धडकेत तीन हरणांचा मृत्यू झाला आहे.

तोफखाना पोलीस ठाण्यातील अधिकारी गस्त घालत असताना त्यांना ही हरणं जखमी अवस्थेत आढळली. यात दोन मादी आणि एक नराचा समावेश आहे. सुमारे अडीच ते दोन वर्षे वयोगटातील ही हरणे आहेत. तोफखाना पोलीस ठाण्यातील अधिकारी गस्त घालत असताना त्यांना ही हरण जखमी अवस्थेत आढळली. पोलिसांनी तत्काळ वन विभागाच्या अधिकार्‍यांना संपर्क साधून माहिती दिली. वनविभागाचे वनक्षेत्रपाल बी. व्ही. शिंदे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमी हरणांना ताब्यात घेतले. जखमींपैकी दोन हरणांचा जागीच मृत्यू झाला होता. तिसरे हरण पशुवैद्यकीय चिकित्सालय घेऊन येत असतानाच मयत झाले.


तिन्ही हरणांची उत्तरीय तपासणी करण्यात आली असून, वाहनाची जोरदार धडक बसल्याने या हरणांचा मृत्यू झाला असल्याचा अहवाल पशु वैद्यकीय विभागाने दिला आहे. दरम्यान अज्ञात वाहन चालकाविरुद्ध वनविभागाने अपघाताची नोंद घेत हरणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवला असल्याचे वनक्षेत्रपाल शिंदे यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post