आंतरजातीय मुलाच्या प्रेमात पडलेल्या मुलीस संरक्षण द्या



मुंबई




आंतरजातीय मुलाच्या प्रेमात पडलेल्या १९ वर्षांच्या मुलीने उच्च न्यायालयात धाव घेऊन आम्हाला आई-वडीलांबरोबरच कुटूंबियांकडून जिवितास धोका असल्याने २४ तास पोलीस संरक्षण द्या, अशी विनंती करणारी याचिका काल उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेची गंभीर दखल घेत न्यायालयाने आज तातडीने त्यावर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता उच्च न्यायालयाने तळेगाव येथील पोलिसांना रीतसर तक्रार घेऊन मुलीच्या सुरक्षेची उपाय करण्याचे आदेश दिले आहेत.


पुण्याच्या या मुलीच्या वतीने ऍड. नितीन सातपूते यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाने तातडीने दखल घेतली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post