विधानसभेसाठी मनसेची पक्षबांधणी

केडगाव उपनगरातील युवकांचा मनसेत प्रवेश
माय नगर टीम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होवुन केडगाव उपनगरातील सुमारे २०० युवकांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ व शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे.




केडगाव मधील सुनील धिवर,अमन काझी, सागर जरबंडी, अनिल धिवर, गणेश धिवर, गौरव चन्ने, दीपक राऊत, आकाश भांगरे, प्रदीप धिवर,चंद्रकांत देखाटे, गणेश पोळ, गणेश गायकवाड, प्रतिक चन्ने, आकाश जरबंडी, मोबू पाल, प्रदीप धिवर, इरफान शेख, अनिकेत शिंदे, निलेश सोनवणे, लक्ष्मण पाटील, स्वप्निल सानप यांच्या सह युवकांनी मनसेत प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक मोरे, तुषार हिरवे, विकास वाढवणे, अविनाश क्षेत्रे आदी उपस्थित होते.


नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा एकही उमेदवार निवडणूक लढवत नसतानाही राज्यभरात विविध ठिकाणी जाहीर सभा घेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष वेधल्याने मनसे पुन्हा चर्चेत आली असून युवक वर्ग पुन्हा एकदा मनसेकडे आकर्षित होवू लागला आहे. या निवडणुकीत इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत राज ठाकरे यांच्या सभा आणि लाव रे तो व्हिडीओ म्हणत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर केलेली टीका. त्यांनी आज पर्यंत खोटी आश्वासने देवून जनतेची केलेली फसवणूक राज ठाकरे यांनी व्हिडीओ क्लिप च्या माध्यमातून जनतेसमोर आणल्याने राज्यातच नव्हे तर देशभरात राज ठाकरेंची चर्चा झाली. त्यामुळे पक्षाला पुन्हा नवचेतना मिळाली असून अनेक युवक मनसेकडे आकर्षित होत आहेत असे यावेळी शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर यांनी सांगितले.


जिल्हाध्यक्ष सचिन डफळ म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पक्षाची नव्याने बांधणी सुरु करण्यात आली आहे.अनेक युवक मनसेकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. नगर शहरातील तसेच जिल्ह्यातील अनेकांचे पक्षप्रवेश लवकरच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post