प्रा. डॉ. सुभाष कडलग यांना मातृशोक


माय नगर टीम 
पुणे विद्यापीठाचे माजी सिनेट व स्थायी समिती सदस्य, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक प्रा. डॉ. प्रा.सुभाष कडलग सरांच्या मातोश्री श्रीमती सखुबाई धोंडीबा कडलग यांचे मंगळवार दि. ३० एप्रिल रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात प्रा. सोमनाथ कडलग मुलगा, व सौ. लता जाधव (नाशिक) मुलगी, जावई भास्कर जाधव (नाशिक), सुना, नातवंडे असा परिवार आहे त्या अत्यंत मनमिळावू, धार्मिक स्वभावाच्या होत्या. जिल्हा न्यायाधीश कै. अशोकराव कडलग यांच्या त्या मातोश्री तर कॉम्रेड सहाणे मास्तर यांच्या भाची होत. त्यांचा अंत्यविधी जवळे कडलग येथे ६ वाजता झाला. त्यावेळी विविध श्रेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, शिक्षक नेते आप्पा शिंदे, प्रा. के. आर. माने प्राचार्य दिलीप फलके, अगस्ती साखर कारखान्याचे संचा लक अशोकराव देशमुख. टि. डी. एफ. चे. नेते हिरालाल पगडाळ यांनी श्रद्धांजली वाहिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post