मी प. बंगालमध्ये जातोय, दीदी काय करतात पाहू : मोदी


माय नगर वेब टीम
मऊ – भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या मंगळवारी झालेल्या “रोड शो’ वेळी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना पुन्हा एकदा आव्हान दिले आहे की, ‘आज मी पुन्हा बंगालमध्ये जाणार आहे. पाहुया, आता काय होते ते.’

उत्तर प्रदेशमधील मऊ येथे प्रचारसभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील घटनाक्रमाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी मिदनापूर येथील माझ्या सभेदरम्यान तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे मला माझे भाषण थांबवावे लागले होते. आता तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी अमित शहा यांच्या सभेदरम्यान गोंधळ घातला. मात्र आज मी पुन्हा बंगालच्या दौऱ्यावर जात आहे. पाहुया काय होते ते,” अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी तृणमूलला आव्हान दिले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post