पुणे- पुण्यात एका इंजिनिअरिंगमध्ये शिकणाऱ्या तरुणीला जवळ ओढून किस करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. लष्कर परिसरात जे.एम. रोडवर ही घटना घडली. याप्रकरणी एका 42 वर्षीय व्यक्तीवर लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आले आहे.
पीडित तरुणी लष्कर परिसरातील जे.एम. रोडवरुन जात होती. एका मित्राला पत्ता विचारण्यासाठी तिने मोबाईलवरुन कॉल केला. पण बॅटरी डाऊन झाल्यामुळे तिचा फोन बंद पडला. यामुळे तिने रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीला त्याचा फोन मागितला. आरोपीने मोबाईल दिल्यावर, तिने मित्राला कॉल करुन पत्ता विचारला. यानंतर तरुणीने त्याचा मोबाईल परत केला आणि धन्यवाद दिले. यावेळी आरोपीने तिचा हात पकडून तिला जवळ ओढून बळजबरीने किस केले. अचानक सर्व काही घडल्याने क्षणभर तरुणीला काहीच कळले नाही. या घटनेनंतर मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली.

Post a Comment