
माय नगर वेब टीम
मुंबई - राधाकृष्ण विखेंचा भाजप प्रवेश निश्चित आहे. केवळ मुहूर्त काढायचा बाकी असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सागितलं.
सध्याच्या परिस्थितीला कोणालाही काँग्रेसमध्ये राहण्याची इच्छा नाही, असं म्हणत विखेंसह अनेक काँग्रेस नेते भाजपप्रवेश करणार असल्याचं सूचक वक्तव्य महाजनांनी केलं आहे.
काँग्रेसचे बंडखोर नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात चर्चानां उधाण आलं आहे. मात्र गिरीश महाजनांच्या या वक्तव्यामुळे विखेंंच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला आहे.
दरम्यान, आज सकाळी विखेंनी महाजनांची भेट घेतली आहे. आगामी मंत्रीमंडळ विस्तारात विखेंना कोणतं खातं मिळतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Post a Comment