माय नगर वेब टीम
अहमदनगर
आम्ही सर्व कुटुंब रस्त्यावर आलेलो आहोत, रोज घरी मानसिक दुःख आणि खायला अन्न नाही, अशा पद्धतीने रोज जिवंत मरण आम्ही भोगत आहोत. रोज तडफडून मरण्यापेक्षा एक तर त्यांच्यावर कारवाई करा आणि आम्हाला आमची जमीन परत द्या, जमीन परत देता येत नसेल तर आम्हाला मरणाची परवानगी द्या अशी उद्विग्न मागणी ढेरे कुटुंबियांनी केली आहे. दरम्यान ढेरे कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर उपोषण सुरु केले आहे.
कर्जतच्या तौसीफ़ शेख यांच्याघटने सारखी पुनरावृत्ती आपण होऊ देऊ नका. माझ्या मृत्युनंतर कारवाई करण्यापेक्षा आपण या लोकांवर तातडीने कारवाई करावी. मी जर मरण पावले तर याची सर्वस्वी जबाबदारी सिताराम डोंगरे, पाराजी डोंगरे, तहसीलदार आप्पासाहेब शिंदे व सरकारवर राहील, असे निवेदन उपोषणकर्त्या राधाबाई एकनाथ ढेरे आणि कुटुंबांनी पालकमंत्री राम शिंदे आणि जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment