कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याने गळ्याला लावला फास ; रुईछत्तीशी येथील घटना


माय नगर वेब टीम
अहमदनगर
नगर तालुक्यातील रुईछत्तीशी येथील शेतकऱ्याने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कर्जबाजारीपणातून ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
बाळासाहेब दिनकर गोरे (वय 50, रा. रुईछत्तीशी, ता. नगर) हे मयत व्यक्तीचे नाव आहे. गोरे यांच्या नावे गावातील सेवा सहकारी सोसायटी व इतर आर्थिक संस्थांचे कर्ज होते. दुष्काळी परिस्थिती व वाढत्या कर्जामुळे गोरे यांनी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी (दि. 26) रात्री घडलेल्या घटनेबाबत काल नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गांगर्डे हे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post