जूनी पेंशनबाबत सरकारकडे आग्रह धरणार - आमदार जगताप व कर्डिले यांचे आश्वासन




शिक्षकांचे जिल्हयातील आमदारांना घातले साकडे

माय नगर वेब टीम

अहमदनगर

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी शासनाच्या सेवेत असलेले परंतु सन २००५ नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या माध्यमिक शाळा व तुकड्यावरील काम करणाऱ्या शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आग्रह धरणार असल्याचे आश्वासन आमदार अरूण जगताप व आमदार शिवाजी कर्डिले व् आमदार संग्राम जगताप यांनी दिले.

जिल्हयातील जुनी पेन्शन योजना कृती समितीच्या वतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते याप्रसंगी बोलताना आमदार कर्डिले यांनी सांगितले की मुख्यमंत्री व वित्तमंत्री ,शालेय शिक्षण मंत्री सर्वजण जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सकारात्मक निर्णय घेतील यासंदर्भात कृती समितीचे शिष्टमंडळ भेट घडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार कर्डिले यांनी सांगितले .यावेळी अहमदनगर जिल्हा जुनी पेन्शन योजना कृती समितीचे आपासाहेब शिंदे प्राचार्य सुनील पंडित, महेंद्र हिंगे , सुनील दानवे , बाबासाहेब बोडखे , चंद्रकांत चौगुले व इतर शिक्षक प्रतिनिधी यांनी जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सविस्तर माहिती दिली. २००५ पूर्वी शासनाच्या सेवेत असलेल्या व २००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजनेची मागणी ही नैसर्गिक तत्त्वाला धरून असून कर्मचाऱ्यांची मागणी ही रास्त असून 2005 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांत फक्त शिक्षक आज एकमेव वर्ग योजनेपासून वंचित राहिलेला आहे 2005 पूर्वी सेवेत असलेले शिक्षण सेवक कृषिसेवक इतर क्षेत्रातील सर्वच*कर्मचार्‍यांना पेन्शन योजना लागू असताना 2005 पूर्वी सेवेत असलेल्या शिक्षक बंधू-भगिनी वर अन्याय होऊ न देता त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार जगताप व कर्डिले यांनी सांगितले .जिल्हयातील सर्व आमदारांना यासाठी शिक्षकांनी साकडे घातले आहे .

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post