तुम्हाला सांगून प्रवेश करणार : राधाकृष्ण विखे पाटील




माय नगर वेब टीम

मुंबई - मी कुठली गोष्ट अंधारात करणार नाही, मी प्रवेश करणार आणि तुम्हाला सांगून करणार, असे काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. मी सुजयच्या विजयानंतर गिरीश महाजनांचे आभार मानायला आलो असल्याचे त्यांनी माध्यमाना सांगितले.

भाजप प्रवेशाच्या चर्चेला ऊत आल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज गिरीश महाजन यांची भेट घेतली. गिरीश महाजन यांच्या शासकीय निवासस्थानी विखे पाटलांनी भेट घेतली. यावेळी विखे पाटील यांनी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन लवकरच निर्णय घेईन. माझ्यासोबत कोण येईल हे प्रवेशावेळी कळेल, असेही ते म्हणाले.

दरम्यान विखे पाटील यांची सदिच्छा भेट होती. मात्र ते भाजपामध्ये येतील याबाबत त्यांनीच सांगितलेय, असे या भेटीनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post