अहमदनगर
राज्याचे लक्ष लागून असलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांचा सुमारे दीड लाख मतांच्या फरकाने विजय झाल्याने समर्थकांनी त्यांची विजयी मिरवणूक काढली. दरम्यान प्रचंड मताधिक्क्य घेतल्याने त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले. दरम्यान, पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, माजी मंत्री बबनराव पाचपुते, उपनेते अनिल राठोड, प्रा. शशिकांत गाडे, भानुदास बेरड, दिलीप सातपुते, निखील वारे यांनी जल्लोष साजरा केला.

Post a Comment