कर्डिलेंचा 'ना' राजीनामा




माय नगर वेब टीम


अहमदनगर - आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुतणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे स्वीकृत संचालक संदीप कर्डिले यांनी बाजार समितीचे चेअरमन विलास शिंदे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून राजीनामा दिला आहे. आमदार कर्डीले यांच्या पुतण्यानेच संचालक पदाचा राजीनामा दिल्याने बाजार समितीतील खदखद बाहेर आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बाजार समितीचे संचालकांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. चेअरमन विलास शिंदे यांच्या कारभारावर संचालकांकडून नाराजी व्यक्त केली जात असल्याचे समजते. गेल्या आठ दिवसापूर्वी भानुदास कोतकर समर्थकांनी चेअरमन हटाव चा पवित्रा घेतला होता. परंतु संचालकांनी हाती घेतलेली मोहीम आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या दरबारी जाऊन थंडावली. दरम्यान आ. शिवाजी कर्डीले यांनी संचालकांची बैठक घेत सर्व संचालकांना शांत केले. दरम्यान मागील आठवड्यात झालेल्या बाजार समिती संचालकांच्या सभेत चेअरमन बदलाबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.


परंतु पुन्हा एकदा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पुतणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे स्वीकृत संचालक संदीप कर्डिले यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा देऊन चेअरमन बाबतची खद खद व्यक्त केली आहे.

आता याबाबत आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार अरुणकाका जगताप व बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर कोणता निर्णय घेतात याकडे नगर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post