आऊटडेटेड कीटकनाशकांचा साठा पकडला





माय नगर वेब टीम

अहमदनगर - एक्सपायरी डेट संपूनही किटकनाशके विक्री करणाऱ्या दुकानावर कृषि विभागाच्या पथकाने मार्केट यार्ड मधील एका दुकानावर कारवाई करत कीटकनाशके ताब्यात जप्त केली आहेत. या प्रकारामुळे मुदतबाह्य कीटकनाशके बाजारात विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे.

कृषी विभागाच्या पथकाने नगरच्या मार्केटमधील कीटकनाशके ठेवण्यात आलेल्या गोदामावर आज सायंकाळी चार वाजता छापा घालून मोठ्या प्रमाणात कीटकनाशके जप्त केले. यात मुदतबाह्य झालेले कीटकनाशकांवरील लेबल बदलून त्यावर नव्याने लेबल लावण्याचे काम सुरू होते तसेच या गोदामांमध्ये मुदतबाह्य कीटकनाशके आढळली. त्या कीटकनाशकावरील वेस्टन बदलून तेथे नव्याने वेस्टन लावली जात होती. त्यासाठी लागणारे साहित्य ही भरारी पथकाने जप्त केले. त्यामध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या वेस्टन, शिक्के, बाटल्या, ब्लेड आणि थिनर आदी साहित्यचा यात समावेश आहे. ही कारवाई मुख्य नियंत्रक दीपक पाटील, मोहीम अधिकारी राजेश जानकर, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नीतनवरे आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी एम. आर. देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली असल्याचे समजते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post