'त्या' चारा छावण्यांवर होणार कारवाई



महसूल, जिल्हा परिषदेच्या संयुक्त पथकाने केली क्रॉस चेकिंग

माय नगर वेब टीम

अहमदनगर - जनावरांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत की नाही हे पाहण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन दिवसापूर्वी पथकांची नेमणूक करून अचानक छावण्यांची तपासणी केली. यामध्ये अनेक छावण्यामध्ये अनियमिता आढळून आल्याने त्या चारा छावण्यांवर प्रशासनाची कारवाईची टांगती तलवार असून हलगर्जीपणा करणार्‍या छावणी चालकांना लवकरच नोटीसा बजावण्यात येणार आहे. त्यामुळे छावणी चालकांच्या चिंतेत भर पडणार आहे.

दुष्काळात पशुधन वाचविण्यासाठी शासनाने जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. त्यानुसार सहकारी संस्था व स्वयंसेवी संस्थांच्या छावणी प्रस्तावांना जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. आजमितीस 500 छावण्यासुरू् आहेत. त्यामध्ये 3 लाखांच्यावर लहान-मोठी जनावरे आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post