जिल्ह्यातील चारा छावण्यांवर 127 कोटींचा खर्च
माय नगर वेब टीम
अहमदनगर - अत्यल्प प्रमाणात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यासह राज्यात तीव्र दुष्काळ आहे. दुष्काळात शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्यासाठी सरकारने चारा छावण्या सुरू केल्या. छावण्या सुरू करण्यासाठी 25 जानेवारी 2019 रोजी शासनाने मंजुरी दिली. आत्तापर्यंत जिल्ह्यात 500 छावण्यांना जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. या चारा छावण्यांवर आज पर्यंत तब्बल 127 कोटी रूपये खर्च झाला आहे.
15 एप्रिल पर्यंत 47 कोटी रूपये खर्च झाला होता. त्यापैकी 50 टक्के रक्कम म्हणजेच 24 कोटी रुपये चारा छावणी चालकांना वर्ग करण्यात आले. परंतु 24 कोटी रूपयांपैकी 5 कोटी छावणी चालकांच्या त्रुटी मुळे प्रशासनाकडे परत आले आहे.

Post a Comment