पांढरी पुलावर दोन ट्रकचा अपघात ; चालक सिरीयस
माय नगर टीम
नगर-औरंगाबाद महामार्गावर पांढरी पूल येथे अपघाताची मालिका सुरूच असून बुधवार दि.८ मे रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास हॉटेल अमित समोर ट्रकचा अपघात झाला. यात चालक गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर वरुन औरंगाबादकडे जाणाऱ्या ट्रक (एम. एच.३८ डि.१२३) वरील चालकाचे नियंत्रण सुटून त्याने पुढे चाललेल्या (एम.एच.१६ ए.वाय ९९३३) या ट्रकल धडक दिल्याने हा अपघात झाला. अमित हॉटेल समोर हा अपघात झाला. पाठीमागून धडक दिल्यानंतर ट्रक लिंबाच्या झाडावर
जाऊन आदळला. झाडामुळे समोरून ट्रकची केबिन दाबल्यामुळे ट्रक चालक गाडीच्या केबिनमध्ये सुमारे एक तास अडकून पडला होता. स्थानिकांनी जेसीबी मशिनच्या मदतीने केबिन तोडून चालकास गंभीर अवस्थेत बाहेर काढले. व तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.

Post a Comment