प्रियकराला धडा शिकवण्यासाठी तीनेच फेकले ॲसिड
माय नगर टीम
शहरातील प्रेमदान चौकातील तोरणा हॉटेलवर भरदिवसा अॅसिड फेकल्या प्रकरणी एका युवतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रियकराला धडा शिकवण्यासाठी तीनेच अॅसिड फेकले असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी (दि.६) रोजी दुपारी साडे अकराच्या दरम्यान प्रेमदान चौकातील तोरणा हॉटेल येथे अमीर रशीद शेख (वय-२५, रा. केरुळ, ता आष्टी, जि बीड) हा व त्याचा मित्र अजरुद्दीन शेख याचेसोबत बसलेला असता एका अनोळखी व्यक्तीने अचानक येवून त्या दोघाच्या अंगावर अॅसिड फेकले. त्यामध्ये शेख हा जखमी झाला.
याप्रकरणी पोलिसांनी एका तरूणीस चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिच्याकडे याबाबत अधिक चौकशी केली असता, तिने प्रियकराला धडा शिकण्यासाठी आपणच अॅसिड फेकल्याचे सांगितले. फिर्यादी अमीर रशीद शेख याचे संबंधित तरूणीशी दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते. परंतु शेख हा तीच्या व्यतीरिक्त इतर मुलींशी मैत्री करत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्याचा राग मनात ठेवून त्याला धडा शिकविण्यासाठी डिसेंबर २०१८ पासुन तीने तयारी केली होती.
क्राईम पेट्रोल मालिका पाहून अॅसिड फेकण्याची आयडीया घेतल्याचे या तरूणीने पोलिसांना सांगितले आहे.

Post a Comment