खा.दिलीप गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
माय नगर टीम
भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांच्यावाढदिवसानिमित्तगुरुवार दि. रोजी भरगच्च सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेआहे. सकाळी9.30 वा. दातरंगे मळा येथील मार्कंडेय संकुलमध्ये महेश सब्बन यांच्यावतीनेवृक्षारोपण, सकाळी 9.45 वा. ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात महाआरती, स. 10 वा. उत्कर्षबालघर संस्थेस कपाट वाटप, 10.30 वा. पांजरपोळ येथे गायींना चारा वाटप, 11 वा. जिल्हारुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप, दुपारी 12 वा. मौजे हिरवेझरे ता.नगर येथील दुष्काळी पाहणीव चारा छावणीस भेट, सायं.5 वा. नगर अर्बन बँक परिवाराच्यावतीने बँकेच्या मुख्य कार्यालयातअभिष्टचिंतन व सत्कार सोहळा. सायं.6.30 वा. शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने अभिष्टचिंतनसोहळा स्थळ:खासदार निवास, अशी माहिती शहर भाजपाचे सरचिटणीस किशोर बोरा व अर्बनबँकेचे व्हाईस चेअरमन अशोक कटारिया यांनी दिली.

Post a Comment