उद्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक
मुंबई
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उद्या ९ मे रोजी दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्याचे कामकाज करण्यात येणार असल्या कारणाने हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेड (MSRDC) तर्फे हे काम करण्यात येणार आहे. दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार असून यावेळी मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तासांकरिता पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
यासंबंधी प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं असून सांगण्यात आलं आहे की, महामार्ग पोलीस विभागाच्या वतीने यशवंतराव चव्हाण मुंबई-पणे द्रुतगती मार्गावर प्रवास करणाऱ्या सर्व वाहन चालकांना आणि प्रवाशांना कळवण्यात येत आहे की, ९ मे रोजी दुपारी १२ ते दोन वाजेपर्यंत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्याचे कामकाज महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेड (MSRDC) तर्फे करण्यात येणार आहे.

Post a Comment