पुण्यात भीषण आग ; पाच कामगारांचा मृत्यू


पुणे - पुण्यात देवाची ऊरळी येथील राजयोग साडी सेंटर या दुकानाला लागलेली भीषण आग विझवण्यात आली आहे. अग्निशमन दलाकडून आता येथे कुलिंग ऑपरेशनचे काम सुरु आहे. गुरुवारी पहाटे ४.३० च्या सुमारास या दुकानात भीषण आग भडकली होती.

या अग्निदुर्घटनेत पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि दहा खाजगी टँकर घटनास्थळी दाखल झाले. दुकानात एकूण पाच कामगार होते. धुरामध्ये गुदमरुन व भाजल्यामुळे कामगारांचा मृत्यू झाला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post