अवैध धंद्यावर पोलिसांच्या रेड ; ५२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
माय नगर वेब टीम
अहमदनगर
शहरासह जिल्ह्यत सुरू असणाऱ्या 96 अवैध धंद्यावर पोलिस रेड करत 119 जणांना अटक करण्यात आली आहे. 52 लाख 38 हजार 438 रूपयाचा मुद्देमाल हस्तगात करण्यात आला आहे.
एस.पी इशू सिंधू यांनी अवैध धंद्या विरोधात कारवाईचे आदेश दिले आहे. या आदेशानुसार स्थानिक पोलिस ठाणे व एलसीबीच्या पथकाने शुक्रवारी (दि.17) विविध ठिकाणी छुप्या पध्दतीने सुरू असणाऱ्या अवैध धंद्यावर रेड करत पोलिसांनी 119 जणांना अटक केली. त्याच्याकडून जुगाराचे साहित्य, देशी विदेशी दारू असा 52 लाख 38 हजार 438 रुपयचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Post a Comment