लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा ; 59 जागांसाठी आज मतदान



माय नगर वेब टीम

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील देशातील ५९ लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे.

सातव्या टप्प्यात नरेंद्र मोदी (वाराणसी), पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर बादल (फिरोझपूर), त्यांच्या पत्नी आणि केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर (भटिंडा), पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पत्नी प्रणित कौर (पटियाला), अनुराग ठाकूर (हमीरपूर), झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन (दुमका), किरण खेर (चंदिगढ) या प्रमुख नेत्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.

रविवारी मतदान होणाऱ्या ५९ जागांपैकी १३ जागा उत्तर प्रदेशात आहेत. पंजाब मधील १३, पश्चिम बंगालमधील ९, बिहार आणि मध्य प्रदेशमधील प्रत्येकी ८, हिमाचल प्रदेशमधील ४, झारखंडमधील ३ आणि चंदीगढमधील एका जागेसाठी रविवारी मतदान होणार आहे.या टप्प्यात एकूण ९१८ उमेदवार रिंगणात आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post