शेतकरी अनुदान वाटपाच्या बैठकीस दांडी; बँकांच्या 12 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा
माय नगर वेब टीम
अहमदनगर - जिल्हाधिकारी कार्यलय येथे शेतकरी अनुदान वाटपाच्या बैठकीस दांडी मारणाऱ्या विविध बँकेच्या 12 अधिकाऱ्यांन विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. नायब तहसीलदार माधुरी संपतराव आंधळे यांनी फिर्याद दिली आहे.
नेहा जोशी (आंध्रा बँक), मंगेश कदम (इंडियन बँक), चरण दीप माने (पूर्ण नाव माहीत नाही ), जी. के. देशपांडे, सातपुते (पुर्ण नाव माहीत नाही), वसंत पिल्लेवार, गोविंद झा, सुयोग ब्राह्मणे, धीरज(पूर्ण नाव माहीत नाही), विकास निकाळजे, गायकवाड (पुर्ण नाव पत्ते माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या बँकेतील अधिकाऱ्यांची नावे आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे काल शुक्रवार दि.17 रोजी 4 वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी यांच्या पत्रानुसार नियोजन भवन येथे शेतकरी व दुष्काळ अनुदान वाटपाच्या संबंधी आढावा बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीस गैरहजर राहून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा अवमान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment