नगर, औरंगाबाद हायवे वर वाहने अडवुन लुटणारी दरोडेखोरांची टोळी जेरबंद
वाहनांसह १० लाख ३४ हजाराचा मुददेमाल हस्तगत । स्थनिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस स्टेशनची कारवाई
माय नगर वेब टीम
अहमदनगर
नगरसह औरंगाबाद परिसरात हायवेवर वाहने अडवून त्यांना मारहाण करून जबरी चोरी करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी एलसीबीच्या पथकाने जेरबंद केली. त्यांच्याकडून 10 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
१८ रोजी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त खब-याकडून खात्रीशीर माहीती मिळाली कि, देवगड फाटा ता.नेवासा येथे ट्रकचालकास अडवुन, त्यास चाकुचा धाक दाखवुन, लाथाबुक्यांनी, लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्याचेकडील १०,०००/- रु किं.चा मुददेमाल चोरुन नेणारा एरीयल उर्फ कांतीलाल पवार हा त्याचे साथीदारांसह नेवासा तालुक्यातील खुणेगाव वनीकरण, नेवासा या ठिकाणी पांढरे रंगाचे स्विप्ट कारमधुन आलेले आहेत. अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने पो.नि.दिलीप पवार, तसेच स.पो.नि.संदीप पाटील, पो.स.ई/ज्ञानेश फडतरे, पो.स.ई सचिन खामगळ, पोसई रोहन खंडागळे, पोहेकॉ/दत्तात्रय हिंगडे, बबन मखरे, पोना/मल्लीकार्जुन बनकर, पोना/दिगंबर कारखेले, पोना/रविंद्र कडले , पोना/रविकिरण सोनटक्के, विनोद मासाळकर, दत्ता गव्हाणे, योगेश सातपुते,संदीप घोडके, विजय ठोंबरे, मच्छिद्र बर्डे, रोहित मिसाळ, रोहीदास नवगिरे, चालक पोना सचिन कोळेकर, चालक सचिन मिरपगार, बाळासाहेब भोपळे, तसेच नेवासा पोस्टे पोनि.रणजित डेरे व स्टाप, शेवगाव पोस्टे पोनि रामराव ढिकले व स्टाप, सोनई पोस्टेचे स.पो.नि देशमाने व स्टाप अशांनी मिळून खुणेगाव वनीकरणाजवळ नेवासा येथे जावून मिळालेल्या बातमीची खात्री करता संशयित इसम हे डांळीबाचे बागेत लपुन बसलेले दिसले. पोलिसांनी तेथे सापळा लावत त्यांच्या मुसक्या आवळल्या .
एरीयल उर्फ आर्यन कांतीलाल काळे वय-२०, रा.लिंबे जळगाव,ता.गंगापुर जि.औरंगाबाद, सुंदरसिंग उर्फ गुलब्या शिवाजी भोसले वय-, रा.गोंडेगाव ता.नेवासा जि.अ.नगर, सुनिल बाबाख़ान भोसले वय-१८, रा.गोंडेगाव ता.नेवासा , श्रावण रतन चव्हाण वय-२०, टेलगेट, तालखेड, ता. माजलगाव जि.बीड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चार चाकी वाहन, आठ मोबाईल, मोटर सायकल, सोने चांदीचे दागिने असा 10 लाख 34 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Post a Comment