बाबुर्डी बेंद येथे दोन दिवस खंडोबा यात्रा उत्सवाचे आयोजन



 माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर -अहिल्यानगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे खंडोबा यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्ताने दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन बाबुर्डी बेंद ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.



सालाबादप्रमाणे कालाष्टमीला 10 एप्रिल 2026 रोजी खंडोबा यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्ताने भाविक जेजुरी येथील कऱ्हा नदी पात्रातून कावडीने पाणी आणतात. शुक्रवारी सकाळी कावडधारकांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. कावडधारक सकाळी आठ वाजता देवाला पाणी घालतील.



 सायंकाळी सात वाजता महाआरती होईल. त्यानंतर काठी मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री जागरण गोंधळ कार्यक्रम होईल. 11 एप्रिल 2026 रोजी भव्य आर्क्रेस्ट्राचे नियोजन करण्यात आले आहे. दोन दिवस खाऊचे व खेळण्याचे दुकाने राहणार आहेत. यात्रेनिमित्त होणार्‍या विविध कार्यक्रमांचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन बाबुर्डी बेंद ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post