माय नगर वेब टीम
मुंबई : विकृत अशोक खरातचं आणखी एक कांड समोर आलंय... या खरातनं फक्त महिलांचं शोषण नाही तर बड्या धेंडांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून कोट्यवधींची खंडणी उकळलीय.. मात्र त्यासाठी खरातची मोडस ऑपरेंडी कशी होती?
महिलांचं शोषण करणाऱ्या खरातच्या मुसक्या आवळल्यानंतर आता या खरातच्या विकृतीचं आणखी एक कांड समोर आलंय... होय.... ब्लॅकमेल कांड... पाखंडी खरात अगदीच आश्रम सीरीजमधल्या बाबा निरालाप्रमाणे आधी महिलांना गुंगीचं औषध देऊन अत्याचार करायचा... महिलांना प्रेग्नेंट करायचा... आणि त्याच्याकडे आलेल्या श्रीमंत पुरुष भक्तांसोबत लैंगिक संबंधांसाठी जोड्या जुळवायचा... त्यांच्यात संबंध घडवून आणायचा... आणि त्याच्या व्हिडीओ रेकॉर्डिंग करुन हनी ट्रॅपचं जाळं टाकायचा... असंच जाळं टाकून खरातनं नाशिकमधील श्रीमंत उद्योगपतींकडून 20 कोटींची खंडणी उकळल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिलीय..
त्याचं झालं असं की खरातनं एका महिलेला भीती घालत अत्याचार केला.. त्यानंतर त्या महिलेचा वापर हनी ट्रॅपसाठी सुरु केला.. नाशिकच्या एका श्रीमंत उद्योगपतीसोबत महिलेची ओळख करुन दिली...आधी मैत्री आणि नंतर महिलेसोबत उद्योगपतीचे शरीरसंबंध घडवून आणले...त्यानंतर खरातनं कट रचला..आणि महिला प्रेग्नेंट आहे.. हे तु काय केल? असं म्हणत उद्योगपतीला भीती घातली... हे प्रकरण मिटवण्यासाठी उद्योगपतीकडून 20 कोटीची खंडणी उकळली.. मात्र तरुणी आणि उद्योगपतीची भेट झाल्यानंतर खरातचा हा बनाव उघड झाला...
खरातचं हनी ट्रॅपचं प्रकरणही समोर आल्यानं या प्रकरणात फक्त एकाच उद्योगपतीला हा गंडा घातलाय की आणखीही राजकीय आणि प्रशासनातील अधिकारीही ढोंगी खरातच्या हनी ट्रॅपचे बळी ठरलेत... याचा तपास करुन खरातच्या ब्लॅकमेलिंगचं रॅकेट उद्ध्वस्त करण्याची गरज आहे...

Post a Comment