मोठी अपडेट: अहिल्यानगरमधील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश



माय नगर वेब टीम

मुंबई : अहिल्यानगर वन विभागातील, मोजे खारे कर्जूने अहिल्यानगर वनपरिक्षेत्रामध्ये दिनांक १२.११.२०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजेच्या सुमारास कु. रियंका सुनील पवार, वय ५ वर्ष, राहत्या घराजवळ थंडीमुळे शेकोटी करुन शेकत असतांना बिबट या वन्यप्राण्याने अचानक हल्ला करुन तिला उचलून नेले. तद्नंतर तिचा शोध घेतला असता दिनांक १३/११/२०२५ रोजी सकाळी तुरीच्या शेतात अंदाजे ५०० मिटर दाट प्रोसॉफिस असलेल्या झुडपामध्ये तिचा अर्धवट खालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

दिनांक १४/११/२०२५ रोजी खारे कर्जुने गावापासून सरासरी ३.०० कि.मी अंतरावरील इसळक ता. अहिल्यानगर, जि. अहिल्यानगर गावातील गेरंगे वस्ती वर कुमार राजवीर रामकिसन कोतकर, वय वर्ष ०८ या मुलावर बिबट वन्यप्राण्याने सांयकाळी सुमारे ६.३० ते ७.०० च्या दरम्यान जिवघेणा हल्ला केला त्यामध्ये तो मुलगा गंभिर जखमी झालेला असून त्याच्यावर अतिदक्षता विभगामध्ये उपचार चालु आहेत.

वरील दोन्ही घटना एकाच बिबट वन्यप्राण्याने केलेल्या असल्याची शक्यता असल्याने सदर मानवी जीवितास धोकेदायक आहे. परिस्थितीनुसार अहिल्यानगर वन विभागातील, मौजे खारे कर्जूने अहिल्यानगर वनपरिक्षेत्रामध्ये परिसरात वावरत असलेला व मानवी जिवीतास धोकादायक ठरलेल्या बिबटयास जेरबंद करणे कामी अथक प्रयत्न करून देखील तो जेरबंद/बेशुध्द करून जेरबंद होत नाही. पिंज-यात ही येत नाही, इंजेक्शनव्दारे बेशुद करण्यासाठी थांबत ही नाही तसेच त्याचे Tranloction/Reloction करणे ही शक्य नाही . याकरिता भविष्यातील अधिकची जिवीत हानी होवू नये यास मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या बिबट वन्यप्राण्यास ठार मारण्याची (Hunting) याव्दारे परवानगी देण्यात येत आहे. सदर आदेश दिनांक ३१ डिसेंबर, २०२५ पर्यंत वैध राहतील.. असे आदेश (एम. श्रीनिवास रेड्डी) मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी दिले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post